विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:44 IST2021-07-14T11:44:35+5:302021-07-14T11:44:41+5:30

Attempt to kill a married woman by poisoning her : सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Attempt to kill a married woman by poisoning her | विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड :  विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध धाड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती. अत्यवस्थ असलेल्या विवाहितेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस आरोपी खाजबी म. अलीम, म. अलिम म. अयुब, म. नदीम म. अलिम,  शिफा कुदुस खाँ  व अन्य एक अशा सासरच्या लोकांनी १० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान विवाहितेस जबरदस्तीने विषारी औषधी पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी विवाहितेस गंभीर अवस्थेत बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पाचही आरोपी फरार  सध्या फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश अपसुंदे व कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान जिल्ह्यात विवाहित महिलांवर सासरी होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. खामगाव येथेही मधल्या काळात अशीच एक घटना घडली होती.

Web Title: Attempt to kill a married woman by poisoning her