उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत
By सदानंद नाईक | Updated: August 12, 2022 19:52 IST2022-08-12T19:50:44+5:302022-08-12T19:52:35+5:30
Ulhasnagar: उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

उल्हासनगरात अट्टल मोटरसायकल चोर जेरबंद, ८ मोटरसायकली हस्तगत
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने तडीपार अट्टल मोटरसायकल चोराला जेरबंद केले असून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किंमतीच्या ८ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोटीच्या घटनेत वाढ झाली आहे.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अनिल मांगले यांना गुप्त बतमीदाराद्वारे एक तडीपार गुंड मोटरसायकली चोरी करीत असल्याची माहिती मिळावी. त्यानुसार अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून तडीपार गुंड सलमान उर्फ बल्लू बाबा शेख याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीच्या ८ मोटरसायकली जप्त केल्या. त्याच्याकडून अधिक गुन्ह्याची उकल होते का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.