उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:06 PM2021-09-28T17:06:57+5:302021-09-28T17:22:42+5:30

Terrorist Arrested : लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे. 

Attacks like Uri thwarted the terrorists' plot; Great success for the army | उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

उरीसारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला; लष्कराला मोठं यश

Next
ठळक मुद्दे४ दहशतवाद्यांनी आल्या पावली पाकिस्तानात पळ काढला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे.

जम्मू काश्मीर - भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट लष्कराच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. लष्कराने ९ दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एकाने आत्मसमर्पण केले आहे. 

 

या दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. १८ सप्टेंबरला सहा दहशतवादी भारतीय सीमेमध्ये घुसल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून लष्कराने त्यांना शोधण्यासाठी कंबर कसली. ऑपरेशनदरम्यान २६ सप्टेंबर एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून एकाने आत्मसमर्पण केले आहे. पाकिस्तानी सैन्याची या दहशतवाद्यांना मदत असल्याचा संशय आहे. 

४ दहशतवाद्यांनी आल्या पावली पाकिस्तानात पळ काढला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. ताब्यात असलेला दहशतवादी लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. तसेच तो पाकिस्तानचा रहिवाशी आहे. अली बाबर पात्रा (१९) असं या दहशतवाद्याचं नाव आहे. तो पाकिस्तानातील दिपालपूर ओकारा पंजाब प्रांतात राहणारा आहे. लष्कर ए तोयबाचा अली सदस्य आहे. अलीने पाकिस्तानात ३ महिने दहशतवादी प्रशिक्षण घेतले आहे. पाकिस्तानमधून शस्त्र पुरवठा करण्यासाठी आल्याची कबुली अलीने दिली आहे. 

Web Title: Attacks like Uri thwarted the terrorists' plot; Great success for the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app