कोर्टात जामीन राहिल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

By सदानंद नाईक | Updated: January 23, 2024 13:48 IST2024-01-23T13:47:51+5:302024-01-23T13:48:17+5:30

या हल्ल्यात अग्रवाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Attacked with a sword out of anger at being granted bail in court | कोर्टात जामीन राहिल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

कोर्टात जामीन राहिल्याच्या रागातून तलवारीने हल्ला

उल्हासनगर : भांडण झालेल्या इसमाला कोर्टात जामीन राहिल्याच्या रागातून फुंदे दाम्पत्यांने प्रमोद अग्रवाल यांच्यावर सोमवारी रात्री साडे आठ वाजता धोबीघाट रस्त्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अग्रवाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-१ धोबीघाट परिसरातील कमला नेहरूनगर येथे प्रमोद श्यामसुंदर अग्रवाल कुटुंबासह राहतात. याच परिसरात राहणारे दिनकर फुंदे व मोहन पाटील उर्फ वासवानी यांच्यात काही महिन्यांपूर्वी भांडं झाले होते. यातील मोहन पाटील उर्फ वासवानी यांना अग्रवाल कोर्टात जामीन राहिले होते. याचा राग दिनकर फुंदे यांना आला होता. 

सोमवारी रात्री साडे आठ वाजता घोबीघाट रस्त्यावर दिनकर फुंदे व ज्योती फुंदे यांनी कोर्टात जामीन राहिल्याच्या रागातून तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद अग्रवाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Attacked with a sword out of anger at being granted bail in court