रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य

By जितेंद्र कालेकर | Updated: September 20, 2024 23:15 IST2024-09-20T23:14:15+5:302024-09-20T23:15:02+5:30

कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Attacked on the head with an iron rod for asking for money to fill gas in a rickshaw; Acts done under the influence of alcohol | रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य

रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी दोनशे रुपये मागितल्याच्या रागातून विष्णू बुद्धिवंत (३०, रा. मानपाडा, ठाणे) या रिक्षाचालकावर त्याचाच मित्र जयेश पाटील (३४, रा. मानपाडा, ठाणे) याने एका लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी दिली.

विष्णू हा टाटा प्लेय फायबर या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीला आहे. त्याच्याच घराशेजारी राहणारा जयेश कोरडे (३४, रा. महात्मा फुले नगर, मानपाडा, ठाणे) याची आणि विष्णू या दोघांची चांगली मैत्री आहे. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोघांनी एकत्र मद्यप्राशन केले. त्यानंतर रिक्षामध्ये गॅस टाकण्यासाठी पाटील याच्या वडिलांकडे दोनशे रुपयांची मागणी विष्णू याने केली. तेंव्हा आपल्या वडिलांकडे दोनशे रुपयांची मागणी का केली, यावरून विष्णू आणि जयेश यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी जयेश याने विष्णू याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला.

 

Web Title: Attacked on the head with an iron rod for asking for money to fill gas in a rickshaw; Acts done under the influence of alcohol