शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी मांजरांच्या ब्रीडिंग व्यावसायिक स्पर्धेतून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 20:04 IST

सध्या पुण्यात परदेशी जातीची कुत्री, मांजरी पाळण्याचे प्रमाण वाढले आहे.

पुणे : परदेशी मांजरपालन व विक्री व्यवसायाच्या व्यावसायिकावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्याची घटना कात्रज भागात घडली आहे. मांजर पालन व्यवसायातील व्यावसायिक स्पर्धेतून हा हल्ला झाला असल्याचा संशय या तरुणाने व्यक्त केली आहे. यासीन रियाज नदाफ (वय २६ रा़ संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्या या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचा मित्र पियुष अमृतलाल कवया (वय ३०, रा़ साईलिला, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) हाही जखमी झाला आहे. याप्रकरणी यासीन नदाफ यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन नदाफ हे मूळचे गोव्याचे आहेत. सध्या परदेशी जातीची कुत्री, मांजरी पाळण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नदाफ यांनी परदेशी मांजरी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात त्यांच्याबरोबरच आणखी दोन ते तीन जण अशा प्रकारे मांजरी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. परशियन जातीच्या मांजरीचे ब्रीडिंग ते करतात़ २० जून रोजी रात्री त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून बोलाविण्यात आले़. त्यानुसार ते कात्रज येथील जेपीएसएस चौकाजवळ गेले. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण तेथे आले. आरोपींनी नदाफ यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ओळख पटवली. त्यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने नदाफ यांच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केला. दुचाकीस्वार आणि त्याचा साथीदार तेथून पसार झाले. मांजर पालन व्यवसायातील स्पर्धेतून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा संशय नदाफ यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस