प्रेम प्रकरणातून तरुणावर खुनी हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:05 IST2018-09-23T06:05:41+5:302018-09-23T06:05:56+5:30

प्रेम प्रकरणातून एकावर खुनी हल्ला झाल्याची घटना बेलापूर गावात घडली आहे. यामध्ये जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Attack on young man in a love affair | प्रेम प्रकरणातून तरुणावर खुनी हल्ला  

प्रेम प्रकरणातून तरुणावर खुनी हल्ला  

नवी मुंबई -  प्रेम प्रकरणातून एकावर खुनी हल्ला झाल्याची घटना बेलापूर गावात घडली आहे. यामध्ये जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी मारेकऱ्याला तत्काळ अटक केली आहे.
लंकेश प्रसाद (२६) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बेलापूर गावात भाड्याने राहणारा असून ज्याच्यावर हल्ला झाला तो संजय सलेशा (२४) हा देखील त्याच परिसरातला राहणारा आहे. संजय व लंकेश यांच्यात तीन दिवसांपूर्वी मुलीवरून भांडण झाले होते, त्याचा राग लंकेशच्या मनात होता. यावरून त्याने शुक्रवारी संजयला भेटण्यासाठी बेलापूर गावात बोलावले. त्या ठिकाणी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले असता, लंकेश याने सोबत आणलेला चाकू संजयच्या पोटात खुपसला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी लंकेशविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Attack on young man in a love affair