पिंपरी : भररस्त्यात काही जणांमध्ये भांडणे सुरू होती. त्यातील महिलांना ताब्यात घेत असताना महिलापोलिसाला घरगुती वापराचा चाकू मारला. महिला पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणला. कासारवाडी येथे शंकर मंदिराजवळ रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर अरविंद नलावडे (वय ४५, रा. सर्वत्र विहार, एमईएस कॉलनी) व रिना डॅनियल जोन्स (वय ४०, रा. शंकरवाडी, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई एस. बी. कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.कासारवाडीतील शंकरवाडी येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भांडणे सुरू असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शंकरवाडी येथे भर रस्त्यात भांडणे सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावेळी भांडणे करणाºयांना दूर करून ताब्यात घेताना आरोपी डॉलर नलावडे हिने फिर्यादी महिला पोलीस शिपाई कांबळे यांना चापट मारली. तसेच आरोपी रिना जोन्स हिने घरातील वापराचा चाकू मारला. यात त्यांना मार लागला. फिर्यादी कांबळे यांच्यावर हल्ला करून आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
कासारवाडीत महिला पोलिसावर हल्ला : दोन महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:02 IST
भररस्त्यात काही जणांमध्ये भांडणे सुरू होती. त्यातील महिलांना ताब्यात घेत असताना महिला पोलिसाला घरगुती वापराचा चाकू मारला..
कासारवाडीत महिला पोलिसावर हल्ला : दोन महिलांना अटक
ठळक मुद्देघरगुती वापरातील चाकू मारला