शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

खाकीवर हल्ला! टवाळखोरांना अडविले; अंगावर दुचाकी घातल्याने पोलीस अधिकारी गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:55 IST

कर्फ्युवेळी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर माथेफिरू व  टवाळखोर तरुणांकडून घालण्यात आली दुचाकी

ठळक मुद्देवसईच्या गोखीवरे येथील धक्कादायक घटना पोलीस अधिकारी गंभीर जखमी : रुग्णालयात उपचार सुरूया प्रकरणी टवाळखोर तरुण घटनास्थळवरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

वसई  - कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन म्हणजे संचारबंदीमुळे (कर्फ्यू) मंगळवारी रात्री पासूनच वसई पूर्वेस गोखीवरे नाक्यावर (वाकणपाडा) येथे नाकाबंदी करीत असताना कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर काही टवाळखोर तरुणांकडून  दुचाकी चढवून त्यांना जीवे मारण्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी वसई पुर्वेस घडला. या प्रकरणी टवाळखोर तरुण घटनास्थळवरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

सुनील पाटील असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी रात्री 12 वाजता देशात संचारबंदी लागू झाल्यानं पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांची ड्युटी गोखीवरे वाकणपाडा येथे लावण्यात आली होती.

त्यामुळे 25 मार्चला  बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास काही टवाळखोर तरुण त्याभागात दुचाकी फिरवत होते. त्यावेळी त्यासर्वांना पोलिसांनी हटकले व त्यांना जागीच थांबण्याचा इशाराही दिला असता ते सर्वजण पळू लागले. मात्र, त्याचवेळी या सर्वांना पकडताना पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील थेट एका टवाळखोर तरुणाच्या दुचाकी समोरच रस्त्यावर उभे राहिल्याने त्यातील एका माथेफिरूने पाटील यांच्या अंगावरच चक्क दुचाकी गाडी घालून त्यांना फरफटत नेण्यात येऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यावर तो दुचाकीस्वार व इतर सर्वजण पसार झाले.परिणामी या घटनेत पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने त्यांना लागलीच नजीकच्या खाजगी (आयसीएस) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आता पोलीस यंत्रणा त्या टवाळखोर तरुण व माथेफिरूचा तपास करीत आहे.

अखेर त्या टवाळखोर तरुणास वालीव पोलीसांनी पकडून अटक केली आहेसकाळी 11 वाजता वसई पूर्वेस वाकणपाडा येथे ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील वय 31यांना नाकाबंदी वेळी टवाळखोर तरुणाने पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील यांना (mh48 ab 2247)ही गाडी अंगावर घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

त्यास वालीव पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि क्रं.320 /2020  नुसार विविध कलमानव्ये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सहलाद राकेश राजभर वय 22 वर्षे,रा. नालासोपारा पूर्व,वाकणपाडा या टवाळखोर व माथेफिरू आरोपींला अटक करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

वसई विरार मध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून लाठीचे फटके, हुल्लडबाजावर कडक कारवाई होणं गरजेचं !कोरोना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र तरीही अनेक हुल्लडबाज तरूण फेरफटका मारण्यासाठी गाडीसहित रस्त्यावर येत आहेत. कुणी बाईक घेऊन, तर कुणी चारचाकी घेऊन बाहेर पडत आहे. मात्र अशा हुल्लडबाजांना पोलीस चांगलाच चोप देऊन लाठीचे फटके देत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या