लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने पोलिसांवर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 22:29 IST2020-04-27T22:25:15+5:302020-04-27T22:29:00+5:30
शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने पोलिसांवर केला हल्ला
मुंबई - लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना रोखताना आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात घडली. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात पोलिसांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली आहे.
Yes Bank Scam : वाधवान बंधूना 4 मेपर्यंत सीबीआय कोठडी
Coronavirus: ओल्या पार्टीत पोलीस धडकले, झिंगलेल्या महिला अन् पुरुषांना अटक
Coronavirus : व्हॉट्स अॅपवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला अन्...
काल सायंकाळी ६. ५० वाजताच्या सुमारास पोलीस अधिकारी व पोलीस पथक हे सरकारी कर्तव्य बजावत असताना रोड क्रमांक आठ व 90 फूट रोड, शहीदे आझम मस्जिदजवळ शिवाजीनगर मुंबई येथे संचारबंदी आदेश तसेच महाराष्ट्र शासनाचे कोविडच्या अनुषंगाने जारी केलेल्या अधिसूचनाचे उल्लंघन करून जमलेल्या लोकांना या परिसरातून निघून जाण्याबाबत सूचना करत असताना बेकायदेशीर जमावातील पंचवीस ते तीस पुरुष आणि दोन महिलांनी बेकायदेशीर मंडळी जमवून पोलीस विरोधी चिथावणीखोर घोषणा दिल्या. तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. त्याचप्रमाणे जमावातील इसमापैकी एकाने पोलीस अधिकारी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडने त्यांचे डोक्यावर हल्ला केला. हल्ला वाचवताना पोलिसांच्या उजव्या हाताचे मनगटास दुखापत झाली. तसेच त्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य बजावताना दुखापत केली. सरकारी मोटर वाहनांचे नुकसान केले. शासनाचे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन होईल असे हयगयीचे कृत्य केले म्हणून गुन्हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला.