शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 6:56 PM

ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. 

ठळक मुद्देएक नायजेरियनला पोलिसांनी पकडले असून दुसरा पळाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. एकाला दीड कोटीचे 1496 ग्रॅम कोकेनसह ताब्यात घेतले आहे.

नालासोपारा - पूर्वेकडील परिसरात दीड कोटीचे कोकेन विकायला आलेल्या नायजेरियनला दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी दुपारी पकडल्याची घटना घडली आहे. एक नायजेरियनला पोलिसांनी पकडले असून दुसरा पळाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात दोन नायजेरियन कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सुनील देशमुख, चंद्रकांत ढाणे, प्रकाश कदम, सचिन पाटील, अनिल चव्हाण, दिनेश गायकवाड, तुषार माळी, जगदीश गोवारी, महेश पागधरे, शुभम ठाकूर, मनोज लोहार, किशोर धनु, सुभाष आव्हाड, नवनाथ तारडे, दीपक पाटील या टीमने पहाटेपासून प्रगती नगर परिसरात दोन टीम बनवून सापळा रचला होता. दुपारच्या सुमारास दोन नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसल्यावर पोलीस त्याठिकाणी पोहचताच एक नायजेरियन आरोपी पळाला पण त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला असून एकाला दीड कोटीचे 1496 ग्रॅम कोकेनसह ताब्यात घेतले आहे. डेयेटा जेरोम (30) असे पकडलेल्या नायजेरियन आरोपीचे नाव आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव हे तपास करत आहे.

टॅग्स :ArrestअटकAnti Terrorist SquadएटीएसDrugsअमली पदार्थPoliceपोलिस