शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एटीएसची कारवाई;  रेल्वे स्थानकावर दोन संशयितांना जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 21:44 IST

पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त;  सर्वत्र खळबळ 

ठळक मुद्दे या दोघांकडे सांकेतिक शब्दातील (कोडवर्ड) एक चिठ्ठीही एटीएसच्या पथकाला मिळाल्याचे समजते. गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  त्यांनी पत्रकारांचे फोन उचलणे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे बिहारमधून गडचिरोली-गोंदियातील नक्षलवाद्यांना ही अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार होते, अशी माहिती आहे. 

नागपूर : बिहारमधून आलेल्या  दोन सशस्त्र संशयीतांना येथील रेल्वेस्थानक परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडे पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतूस सापडले. या दोघांकडे सांकेतिक शब्दातील (कोडवर्ड) एक चिठ्ठीही एटीएसच्या पथकाला मिळाल्याचे समजते. गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

बिहार येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन काही संशयीत नागपूररेल्वेस्थानकावर येत असल्याची माहिती गुरुवारी रात्री एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने मोजक्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवून अत्यंत सावधगिरीने रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावला. बिहारमधून येणा-या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरोनी सिकंदराबाद स्पेशल एक्स्प्रेसमधून गुरुवारी रात्री ८ च्या दरम्यान नमूद वर्णनाचे दोन व्यक्ती उतरले. रेल्वेस्थानकावर यावेळी प्रवाश्यांची मोठी गर्दी होती त्यामुळे गोंधळ उडू नये म्हणून एटीएसच्या पथकाने त्यांना रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या प्रिपेड ऑटो बूथजवळ गराडा घालून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि २० जीवंत काडतूस आढळले. एटीएसच्या पथकाला त्यांच्याकडे आढळलेल्या कागदपत्रात एक कोडवर्डमधील चिठ्ठीही मिळाल्याची माहिती आहे. त्यांना लगेच वाहनात घालून एटीएसच्या पथकाने अज्ञातस्थळी नेले. तेथे त्यांची कसून चौकशी करण्यात आली.विशेष म्हणजे, या कारवाईची भनक प्रसारमाध्यमांना लागू नये यासाठी एटीएसच्या अधिका-यांनी विशेष काळजी घेतली. त्यांनी पत्रकारांचे फोन उचलणे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे बिहारमधून गडचिरोली-गोंदियातील नक्षलवाद्यांना ही अत्याधुनिक शस्त्रे पुरविणार होते, अशी माहिती आहे. 

बिहार आणि यवतमाळ कनेक्शन

पकडण्यात आलेल्या दोघांची नावे कळू शकली नाही. मात्र, त्यातील एकाचे वय ४३ वर्षे असून तो वडगाव (यवतमाळ) येथील अशोकनगरातील रहिवासी आहे. तर, दुस-याचे वय ४९ वर्षे असून तो लक्ष्मीपूर पोस्ट नवागड, जि. मुंगेर (बिहार) येथील रहिवासी असल्याचे समजते.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसnagpurनागपूरrailwayरेल्वेRepublic Dayप्रजासत्ताक दिन