एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:14 IST2019-01-19T19:13:04+5:302019-01-19T19:14:20+5:30
हे पाचही जण पासपोर्टशिवाय बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याकारणाने ही कारवाई करण्यात आली.

एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक
पालघर - आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावासमोरून पासपोर्टशिवाय राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे . हे पाचही जण पासपोर्टशिवाय बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याकारणाने ही कारवाई करण्यात आली.
शमसूर मन्सूर शेख (७०), मोशीया सोमेद मुल्ला (६५), मोहम्मद कोटील खलिफा (६४), मोहम्मद जहांगीर आलं (४७), मोफीस बुऱ्हान शेख (१९) अशी या अटक केलेल्या बांग्लादेशींची नावे आहेत. या पाचही जणांना भारतीय पासपोर्ट अधिनियम १९२० च्या कलम ३ (अ). ६ (अ) सह विदेशी अधिनियम १९४६ चे कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.