एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 23:21 IST2021-05-24T21:32:31+5:302021-05-24T23:21:07+5:30
Thane news: गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख तर त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एटीएस प्रमुख जयजीत सिंह ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख जयजीत सिंह यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. (ATS chief Jayjit Singh transfer at police commissioner of Thane.)
गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष ) विनीत अग्रवाल एटीएस प्रमुख तर त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
संबंधीत नियंत्रक अधिकाऱ्यांनी उपरोक्त अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरीता कार्यमुक्त केल्यानंतर या अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असे या बदलीच्या शासन आदेशामध्ये म्हटले आहे.