लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:00 IST2018-12-23T01:00:13+5:302018-12-23T01:00:22+5:30

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने सांगवी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

The atrocity of the woman by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

वाकड : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने सांगवी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. समाधान चव्हाण (पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. असे पीडित महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मानसिक छळप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : लग्न सासूला मान्य नाही, या कारणावरून शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधीनगर येथील २९ वर्षीय महिलेने आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. लखन साहेबराव कांबळे (पती) यांच्यासह सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात महिलेने फिर्याद दाखल केली आहे. वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The atrocity of the woman by showing lover of marriage