शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

न्यायालयाच्या आदेशानुसार चार जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:56 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती.

ठळक मुद्देचिंचवडेनगर येथील चार आरोपींवर कारवाई 

पिंपरी : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय पुणे येथे दाखल असलेल्या खासगी फौजदारी दाव्याच्या संदर्भाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी तीन महिला आणि एक पुरूष यांच्याविरोधात सोमवारी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ यादव थरकुडे आणि तीन महिला अशा चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रखमाई चिंचवडे बालक मंदिराच्या संचालिका असलेल्या महिलेने अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा खासगी दावा दाखल केला होता. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने सीआरपीसी  कलम १५६ (३) नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चिंचवडेनगर येथील आरोपींविरूद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी