शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, दोन जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:34 IST

महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

लोणावळा : पाटण (ता.मावळ)  येथील महिला सरपंच रुपाली मंगेश पटेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकारणी पाटण गावातील दोन जणांच्या विरोधात मारहाणीसह अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.    रुपाली मंगेश पाटेकर (वय२८, रा. पाटण, ता.मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन,  पाटण गावातील शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने (दोघेही रा. पाटण, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि. ३) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास रुपाली पटेकर ह्या त्यांच्या घराच्यासमोर ओट्यावर भांडी घासत असताना त्याठिकाणी आलेले शंकर तिकोणे व बबन तिकोणे यांनी रुपाली यांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली, यावेळी भांडण सोडविण्याकरिता आलेल्या पटेकर यांच्या सासू इंदाबाई पटेकर व सासरे मारुती पटेकर यांना देखील शिवीगाळ करत हाताने व काठीने मारहाण केली. तसेच पटेकर यांना हाताला धरुन अंगावर ओढून मनाला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे झटापट करून मिठी मारत विनयभंग केला. त्यानंतर घराशेजारच्या काटेरी तारेवर ढकलून देत जखमी केले.     याप्रकरणी पटेकर यांच्या तक्रारीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे तपास करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिस