भाजपा आमदाराच्या पत्नीविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 06:38 IST2019-03-23T06:38:20+5:302019-03-23T06:38:27+5:30

जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांची दुसरी पत्नी प्रिया शिंदे (प्रिया राजू तोडसाम) यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी , शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 Atrocity against BJP MLA's wife | भाजपा आमदाराच्या पत्नीविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी

भाजपा आमदाराच्या पत्नीविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांची
दुसरी पत्नी प्रिया शिंदे (प्रिया राजू तोडसाम) यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटी , शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आमदाराच्या पहिल्या पत्नीने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली होती. त्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. आमदार राजू तोडसाम यांच्या कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून कलह सुरू आहे. दोन पत्नी एकमेकींविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिली पत्नी व कार्यकर्त्यांनी दुसरीला भरस्त्यात मारहाण केली होती.
त्यानंतर महिनाभराने दुसऱ्या पत्नीने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांंना भेटून पहिली पत्नी व मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदविली होती. मात्र, अद्याप त्या प्रकरणात कारवाई झालेली नाही. ही कारवाई प्रतीक्षेत असतानाच आमदाराच्या दुसºया पत्नीविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

माझ्या जीविताला पांढरकवडा येथे धोका आहे. यापूर्वी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे मी प्रत्यक्ष पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यासाठी जाऊ शकत नाही. म्हणूनच मी माझी फिर्याद जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी स्वरूपात दाखल केली. मात्र अद्याप त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
- प्रिया शिंदे, तक्रारकर्ता.

Web Title:  Atrocity against BJP MLA's wife