शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसविणारी टोळी गजाआड, महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गोव्यात फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:48 IST

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते.

 

शिरवळ (जि. सातारा) : एटीएम सेंटरमध्ये वृद्ध, महिलांना पैसे काढण्यात मदत करण्याचा बहाणा करीत एटीएमधारकाची वैयक्तिक माहिती घेऊन हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून परस्पर रक्कम काढून फसवणूक करणारी चार जणांची आंतरराज्य टोळी शिरवळ पोलिसांनी गजाआड केली. या टोळीकडून ६२ एटीएम कार्डसह गुन्ह्यात वापरलेली कार, ८ हजार १०० रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. (ATM card exchange fraud Gang arrested)प्रदीप साहेबराव पाटील (२९), किरण कचरू कोकणे (३५, दोघे रा. म्हारूळगाव, ता. कल्याण, जि. ठाणे), विकी राजू वानखेडे (२१, रा. भय्यासाहेब आंबेडकरनगर, उल्हासनगर), महेश पांडुरंग धनगर (३१, रा. ब्राह्मणपाडा, उल्हासनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते. सुर्वे रक्कम काढत असताना पाठीमागे असलेले दोघे जण हळूच व्यवहार पाहत होते. रक्कम न निघाल्याने पावती पाहत असताना संबंधितांनी एटीएममधील कार्ड हातचलाखीने बदलले. काही वेळानंतर नीलेश सुर्वे यांच्या मोबाइलवर संदेशाद्वारे शिरवळ येथील एका बँकेच्या एटीएममधून तसेच वेळे, आसले येथील पेट्रोलपंपावरून खात्यामधील तब्बल ५० हजार ८१० रुपये काढल्याचे निदर्शनास आले. सुर्वे यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व चोरीचा गुन्हा दखल केला.घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने सीसीटीव्हींची पाहणी आणि गुन्हेगारांच्या चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करीत ही टोळी उल्हासनगर, ठाणे येथील असल्याचे ओळखले. या टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेता ते गोव्यावरून उल्हासनगरला कारमधून निघाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलिसांनी सापळा रचून ही कार पाठलाग करीत अडवून चौघांच्या मुसक्या आवळल्या.आरोपींनी शिरवळ पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांसह ठाणे ग्रामीण येथील पडघा, सोलापूर येथील सांगोला, अहमदनगर येथील राहुरी, पिंपरी-चिंचवड येथील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठ गुन्ह्यांची कबुली दिली.

एका फेरीत लखपती- ही टोळी २०१२ पासून कार्यरत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये २४ गुन्हे दाखल आहेत. - उल्हासनगरहून कारने निघाल्यानंतर विविध ठिकाणी फसवणूक व चोरी करत एका फेरीत ते लखपती होत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएमMaharashtraमहाराष्ट्रjailतुरुंग