शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी निघाली कुटुंबातील पाच जणांची अंत्ययात्रा, धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:33 IST

Suicide Case : गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.

समस्तीपूर : जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ गावात एका कुटुंबातील घरमालक, त्याची आई, पत्नी आणि दोन निष्पाप मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्यानंतर त्या मृतदेहांचे समस्तीपूर सदर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तेथे वैद्यकीय मंडळाच्या डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन करून रविवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गंगेची उपनदी वाया नदीच्या काठावर त्या मृतदेहांवर रविवारी रात्री उशिरा नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासकीय देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून बाहेर पडलेल्या पाच जणांची अंत्ययात्रा पाहताच गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते.

एकाच कुटुंबातील पाचही सदस्यांची अंत्ययात्रा एकत्र घरातून बाहेर पडले, तेव्हा सर्वांचेच हृदय हेलावून गेले, त्यामुळे नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते. त्याचवेळी उपस्थित स्थनिकांचे डोळे पाणावले होते. कुटुंब प्रमुख असलेल्या मनोजच्या या निर्णयाबाबत सर्वजण आपापली बाजू मांडत होते. मनोज यांचे धाकटे जावई खुसरुपूर येथील रहिवासी आशिष मिश्रा यांनी पाचही मृतदेहांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित शेकडो लोकांचे डोळे पाणावले. सीओ अजय कुमार, एसएचओ प्रसंजय कुमार आदी यावेळी उपस्थित होते.विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येने सावकारांची दहशत चव्हाट्यावर येत आहे. तीन लाखांच्या कर्जाच्या व्याजासह 18 लाखांची मागणी सावकाराने केली होती. यासाठी कुटुंबाला त्रास दिला जात होता. मृत मनोजची मोठी मुलगी काजल हिने पोलिसांना सांगितले की, माझ्या लग्नात आजोबांनी गावातील एका व्यक्तीकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. तो व्याज जोडून माझ्या आजोबा आणि वडिलांकडे १८ लाख रुपयांची मागणी करत होता. व्याज घेणारा रोज घरी येऊन शिवीगाळ करत असे. याला कंटाळून दादाने आधीच आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी एक कर्जदार वडिलांची ऑटो रिक्षा घेऊन गेला होता. त्यामुळे घरची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. वडिलांकडे दोन खोल्यांच्या झोपडीशिवाय काहीच नव्हते. घराजवळील एका छोट्या मोकळ्या जागेवरही लोकांनी कब्जा केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारDeathमृत्यू