सहायक इंजिनिअरकडे दोन कोटींची मालमत्ता, सीबीआयची मुंबईत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2023 13:49 IST2023-02-11T13:49:12+5:302023-02-11T13:49:34+5:30
उपलब्ध माहितीनुसार, सहायक इंजिनिअरचे नाव वीरेंद्र प्रताप सिंह असे असून तो २००१ ते २०२० अशा २० वर्षांच्या कालावधीमध्ये गुजरातमधील सुरत येथे कार्यरत होता.

सहायक इंजिनिअरकडे दोन कोटींची मालमत्ता, सीबीआयची मुंबईत कारवाई
मुंबई : केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांच्या मालमत्तेचे घबाड सीबीआयला सापडले आहे. त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा ही मालमत्ता ३६ टक्के अधिक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सहायक इंजिनिअरचे नाव वीरेंद्र प्रताप सिंह असे असून तो २००१ ते २०२० अशा २० वर्षांच्या कालावधीमध्ये गुजरातमधील सुरत येथे कार्यरत होता. त्यानंतर गेली दोन वर्षे तो मुंबईत कार्यरत आहे. त्याच्या मालमत्तेसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सीबीआयने तपासणी केली असता, त्याच्या व पत्नीच्या नावे ही मालमत्ता असल्याचे आढळून आले.
या मालमत्तेमध्ये त्याच्या बँक खात्यातील रकमेखेरीज घाटकोपर येथील आर-सिटी मॉलनजीकच्या ‘द ॲड्रेस’ या इमारतीमध्ये १२ व्या मजल्यावर असलेला १८ कोटी रुपयांचा फ्लॅट, नवी मुंबई येथील खारघर येथे १९ लाख रुपयांचा फ्लॅट, साकीनाका येथे असलेला १३ लाख रुपयांचा फ्लॅट, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे १ लाख २७ हजार रुपयांचा फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.