सहायक आयुक्तांना मारहाण; आव्हाड यांना अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 10:02 IST2023-02-18T10:02:04+5:302023-02-18T10:02:26+5:30
चौघांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ

सहायक आयुक्तांना मारहाण; आव्हाड यांना अटकपूर्व जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याच प्रकरणात दोन दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांच्यासह चौघांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.
शुक्रवारी सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. काही अटी व शर्तींवर आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाला सात व्हिडिओ पुरावे म्हणून दाखविले. त्याआधारे हल्ला करताना कोणतेही शस्त्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच हल्ला झाला त्यावेळी आहेर हे कामावर नव्हते. त्यांना केवळ मुकामार लागलेला असल्यामुळे इतर कलमे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.