आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल

By अनिकेत घमंडी | Updated: March 11, 2023 15:59 IST2023-03-11T15:58:50+5:302023-03-11T15:59:01+5:30

धुळवडीला रेल्वेच्या सातपुलावर केले कृत्य, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याची कारवाई

Assault by saying we are brothers here, beer bottle smashed on head in dombivali | आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल

आम्हीच इथले भाई म्हणत प्राणघातल हल्ला; डोक्यात फोडली बिअरची बॉटल

डोंबिवली - आम्हीच इथले भाई म्हणत सातपुलावर धुळवडीच्या दिवशी एका नागरिकाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. याप्रकरणी अन्य सहा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. महेश माधव चाटसे (२४) व, प्रथम किशोर भोईर (२२) रा मोठा गाव ,डोंबिवली पश्चिम अशी त्या दोघा आरोपींची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी शनिवारी दिली. ते दोघेही सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगण्यात आले.
 
धुलिवंदन दिनी ७ मार्च रोजी संध्याकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे सातपुल येथे एकूण १० ते १२ आरोपितांनी दोन नागरिकांवर नशेच्या धुंदीत आम्हीच इथले भाई असे म्हणत हल्ला करून शिविगाळ केली म्हणून दगड मारून, डोक्यात दारूची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यानुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता, ती हद्द डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तो गुन्हा विष्णूनगर पोलिसांकडे वर्ग।केला. फिर्यादीच्या वर्णनानुसार माहिती घेत त्या दोन।आरोपींना अटक।केली असून त्यांनी गुन्हा।कबूल।केला असून त्यांच्या अन्य साथीदारांचा तपास सुरू असल्याचे दुसाने यांनी सांगितले.
 

Web Title: Assault by saying we are brothers here, beer bottle smashed on head in dombivali