शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच हातात पडल्या बेड्या; होणाऱ्या बायकोनं 'त्याला' दाखवला पोलिसी इंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 19:56 IST

लग्नाला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना काही महिला पोलिसाने तिच्या भावी पतीला अटक करून तुरुंगात टाकले आहे.

नवी दिल्ली - आसाममधील शिवसागर जिल्ह्यात एका महिला सब-इंस्पेक्टरने (Woman Sub-inspector) असे काम केले आहे, ज्याबद्दल तिचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. लग्नाला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना महिला पोलिसाने तिच्या भावी पतीला अटक करून तुरुंगात टाकले आहे. नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. जोनमाई राभा असं य़ा महिला सब इन्स्पेक्टरचं नाव असून तिने फसवणुकीच्या प्रकरणात स्वतःचा होणारा नवरा राणा पगाग याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणा पगागने लोकांना खोटी ओळख करून देऊन त्यांना नोकरी देण्याचे नाटक करून त्यांच्याकडून खूप पैसे उकळले होते. त्यानंतर आता जोनमाईने होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, राणाने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. तो लोकांची फसवणूक करत होता. ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांची त्याने कोट्यवधींची फसवणूक केली आहे. 

आसामच्या नागाव जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलीस सब इन्स्पेक्टरने फसवणुकीत माहीर असलेल्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला आणि त्याला अटक करून नौगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार होते. आरोपींनी चतुराईने सब इन्स्पेक्टरलाही आपल्या जाळ्यात अडकवलं होतं.

आरोपीची जानेवारी 2021 मध्ये सब इन्स्पेक्टर जोनमाईशी भेट झाली होती, जेव्हा ती माजुली येथे तैनात होती. काही महिन्यांनंतर कुटुंबीयांच्या आशीर्वादाने दोघांचा साखरपुडा झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नौगावमध्ये पोस्ट केल्यानंतर जोनमाईला राणाला नोकरी नसल्याचा संशय आला. पण तिने विचारलं असता त्याने खोटं सांगितलं. कोणतीही नोकरी नाही, परंतु त्याने खोटं सांगितले की त्याची सिलचरमध्ये बदली झाली आहे पण त्याला तिथे काम करायचे नाही कारण, त्याला तिच्यापासून दूर राहायचे नाही असं देखील सांगून फसवलं. पण नंतर पोलखोल झाली आणि जोनमाईने त्याला अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी