शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब हादरलं! मध्यरात्री चौकीत घुसून ASI आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:03 IST

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलीस चौकीवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलीस चौकीवर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सीमावर्ती भागातील दोरांगला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिया गावात रात्री १ च्या सुमारास घडली. गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस वेपन घटनास्थळावरून जप्त करण्यात आलं आहे.

वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथक मृतांचे फोन तपासत आहे, जेणेकरून घटनेशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतील. होमगार्ड अशोक कुमार आणि पंजाब पोलीसचे एएसआय (ASI) गुरनाम सिंह यांची हत्या झाली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरदासपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच गुरदासपूरचे एसएसपी आदित्य शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमनेही पाहणी केली. याशिवाय बीएसएफचे डीआयजी जेके विरदी हे देखील घटनास्थळी पोहोचले. एसएसपींनी सांगितले की, दोघे चौकीच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. पोलीस या प्रकरणाचा विविध अँगलने तपास करत आहेत.

या घटनेचा गँगस्टर आणि दहशतवादी अँगलने देखील तपास केला जात आहे, जेणेकरून कोणत्याही संभाव्य कटाची शक्यता नाकारता येणार नाही. याच दरम्यान, या घटनेवरून विरोधी पक्ष काँग्रेसने आम आदमी पार्टी सरकारच्या काळातील राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी 'X' वर लिहिलं की, "गुरदासपूर जिल्ह्यातील अधियान गावात एका चेकपोस्टजवळ आमच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी या हत्येचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. आपल्या राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण संघटित राहायला हवं."

English
हिंदी सारांश
Web Title : Punjab Shaken: ASI and Home Guard Shot Dead in Midnight Attack

Web Summary : In Gurdaspur, Punjab, two police officers were fatally shot at a checkpoint in Adia village. Investigations are underway, exploring potential gang or terror links. Opposition Congress raises concerns about state security following the incident. Senior officials are investigating the case.
टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबार