Aryan Khan Drugs Case: एनसीबीचे अधिकारी मन्नतवर आल्यावर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही चांगले काम करताय, फक्त...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 22:32 IST2021-10-21T22:29:26+5:302021-10-21T22:32:13+5:30
NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती.

Aryan Khan Drugs Case: एनसीबीचे अधिकारी मन्नतवर आल्यावर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही चांगले काम करताय, फक्त...'
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि आर्यन खानसमोर (Aryan Khan) संकटे वाढत चालली आहेत. आर्यन खानला जामिन फेटाळल्याने आज शाहरुख त्याला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. 3 ऑक्टोबरपासून आर्यन खान आधी एनसीबी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. आज एनसीबीची (NCB) टीम शाहरुखच्या मन्नत (Mannat) बंगल्यावर गेली होती. तेव्हा शाहरुख खुपच हतबल झाल्याचे दिसला.
एनसीबी शाहरुख खानला नोटिस देण्यासाठी गेली होती. शाहरुखने स्वत: ही नोटीस घेतली. यावेळी बंगल्यावर आलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांना तुम्ही चांगले काम करत आहात, माझा मुलगा लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावा अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.
आर्यन खानकडे जर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असेल तर ते एनसीबीकडे जमा करावे, असे त्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. शाहरुखच्या घरी व्ही व्ही सिंह गेले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचे काही कागदोपत्री कारवाई राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी ते आले होते. आपले काम झाल्यावर अधिकाऱ्यांटी टीम मन्नतवरून निघाली.
आर्यन खान याच्यासह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या १६ दिवसांत ४ वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.एनसीबीच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्टात आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.
आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत:चा बाहेर पडला.