शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पिंपरीतील उद्रेकानंतर आरोपींची धरपकड सुरु ; पोलिसांवर दगडफेक केल्याचे प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:47 IST

कोरोनामुळे कोणी मरत नाही, मग आम्हाला येथून बाहेर जाऊ द्यायला तुम्हाला काय अडचण आहे...म्हणत नागरिकांनी केली होती दगडफेक ..

ठळक मुद्दे४८ जणांवर गुन्हा दाखल करून पाच आरोपींना केली अटक जमावबंदी, संचारबंदी आदेश असतानाही त्याचे केले उल्लंघन

पिंपरी : प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी सोमवारी दुपारी पोलिसांवर दगडफेक करून खुर्च्या, वाहन तसेच इतर नुकसान केले. याप्रकरणी ४८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ९) पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मण ठोकळ, संदीप वर्मा, विकास जाधव, रमेश साबळे, तेजस गोपरेड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवनुल, विशाल मोरे, करण बोरुले, धन्या खंडागळे, बाळ्या, मुसा बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, विमल गायकवाड, शिला कांबळे, कलावती सोनटक्के, रेश्मा कांबळे, रोहन आसोदे, राहुल चलवादी, रोहीत गोंदणे यांच्यासह इतर २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन येथील मालधक्का जवळ असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास झोपडपट्टीतील काही रहिवासी एकत्र आले. बाहेरील सर्व गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आम्हालाच का विनाकारण या ठिकाणी अडविण्यात येते. आम्हाला महापालिकेकडून कोणत्याही सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात येत नाहीत. तसेच आमच्या अडचणी विचारण्यास येथे कोणीही येत नाही. महापालिकेचे अधिकारी व राजकारणी यांनी आम्हाला दिलेले शब्द पाळलेले नाहीत. कोरोनामुळे कोणी मरत नाही, मग आम्हाला येथून बाहेर जाऊ द्यायला तुम्हाला काय अडचण आहे. गोळ्या दिल्या की, माणसे बरे होतायत. कोणाला काही होत नाही. आमच्यासोबत राजकारण केले जात आहे, असे म्हणून त्यांनी आरडाओरडा केला. जमावबंदी, संचारबंदी तसेच मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केले. पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. पोलिसांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या तोडल्या. पोलिसांच्या खासगी वाहनांचेही नुकसान केले. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून हा भाग सील करण्यासाठी लावण्यात आलेले पत्रे उखडून टाकून शासकीय तसेच इतर मालमत्तेचे ३३ हजार रुपये किमतीचे नुकसान केले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम तपास करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस