सव्वा लाखांची वीज तार चोरणाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 21:50 IST2023-03-08T21:50:22+5:302023-03-08T21:50:43+5:30
दोंडाईचा येथील महावितरण विज कंपनीची १ लाख २६ हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची तारेची अज्ञात चोरट्यानी चोरी केली होती.

सव्वा लाखांची वीज तार चोरणाऱ्यांना अटक
दोंडाईचा ( धुळे): महावितरण कंपनीची १ लाख २६ हजाराची अॲल्युमिनियमची तार चोरणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याजवळून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली आहे.
दोंडाईचा येथील महावितरण विज कंपनीची १ लाख २६ हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची तारेची अज्ञात चोरट्यानी चोरी केली होती. या प्रकरणी दोंडार्सचा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून गुन्हा उघडकीस आणला. वीज चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एकजण फरार झालेला आहे.
संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, दोंडाईचा शहरात गेल्या काही महिन्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, त्या प्रकरणाचाही शोध लावावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.