भरदुपारी पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास करणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 18:59 IST2020-09-11T18:59:00+5:302020-09-11T18:59:31+5:30
मडगाव शहरातील न्यु मार्केटजवळील रेडियो मुंडियाल जवळ ७ सप्टेंबरला ही घटना घडली होती.

भरदुपारी पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास करणारा जेरबंद
मडगाव : पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीची डिकी खोलून आत ठेवलेली २७ हजार रुपये रोकड लंपास करुन पळ काढलेल्या संतोष हनुमंत कटटीमणी याला गोव्यातील मडगाव पोलिसांनीअटक केली. मडगाव शहरातील न्यु मार्केटजवळील रेडियो मुंडियाल जवळ ७ सप्टेंबरला ही घटना घडली होती.
सीसीटिव्ही कॅमेरामध्ये संशयिताची चोरी करताना छबी टिपली गेली होती. नकुल तारी हे तक्रारदार आहेत. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये संशयित संतोष हा पार्क करुन ठेवलेल्या अॅक्टिवा स्कुटरजवळ उभा असून, काहीेंळानंतर तो डिकी खोलून आतील एक पार्सल घेउन जात असताना दिसत होता. मागाहून तारी यांनी या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. २७ हजार, एक धनादेश व तक्रारदाराचे सिनियर सिटिझन कार्ड चोरीला गेले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
गुरुवारी रात्री मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर नागनुरी, गोरखनाथ गावस, दिलखूश वेळीप, विशाल प्रभू व कल्पेश खोलकर या पोलिसांनी संतोषला येथील स्टेशन रोड येथे पकडले. येथील एका लॉजमध्ये तो रहात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १४ हजारही जप्त केले आहे. संतोष हा मूळ कर्नाटकातील बिजापूर येथील आहे.भादंसंच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक
रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?
आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय
कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला