माथाडी बोर्डाच्या सचिवाला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:49 AM2019-05-10T02:49:39+5:302019-05-10T02:49:56+5:30

किराणा बाजार व दुकाने मंडळ बोर्डाचा सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी मंगेश झोले याला गुरुवारी दोन लाखांची लाच घेताना अटक केली आहे.

 Arrested by the Mathadi Board secretary for taking a bribe | माथाडी बोर्डाच्या सचिवाला लाच घेताना अटक

माथाडी बोर्डाच्या सचिवाला लाच घेताना अटक

googlenewsNext

नवी मुंबई  - किराणा बाजार व दुकाने मंडळ बोर्डाचा सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी मंगेश झोले याला गुरुवारी दोन लाखांची लाच घेताना अटक केली आहे. त्याने न्यायालयात सोयीप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितली होती.
किराणा बाजार मंडळाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एका टोळीतील सभासद कामगारांच्या नेमणुक आदेशाविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात हवा तसा अहवाल सादर करण्यासाठी मंगेश झोले याने ७ लाखांची लाच मागितली होती. याबदल्यात न्यायालयात संबंधित टोळीला हवा तसा अहवाल देणार व न्यायालयाने विरोधात निकाल दिला तर पुन:परीक्षण करून तपासणी अहवाल तक्रारदारच्या बाजूने देण्याचे मान्य केले होते. सुरुवातीला सात लाख रुपये मागितले. तडजोडीअंती ६ लाख निश्चित करण्यात आले. गुरुवारी २ लाख रुपये स्वीकारताना अटक केली आहे. लाचलुचपत विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीच्या मालमत्तेचाही तपास केला जात आहे.

Web Title:  Arrested by the Mathadi Board secretary for taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.