वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

By शेखर पानसरे | Updated: July 11, 2023 17:03 IST2023-07-11T17:03:27+5:302023-07-11T17:03:37+5:30

पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Arrested for abusing a 20-year-old disabled girl | वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

घारगाव : वीस वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला घारगाव (ता. संगमनेर) पोलिसांनी अटक केली. सोमवारी (दि.१०) संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात अत्याचाराची घटना घडली होती. सचिन ठका खंडागळे (रा. अकलापूर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
     
वीस वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरी तिचे आई-वडिल नव्हते, मुलगी आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरी असताना सचिन खंडागळे व त्याचा मुलगा तेथे गेले. मुलीचा भाऊ आणि खंडागळे याचा मुलगा या दोघांना घरामागे काढून दिले. त्यानंतर मुलीवर त्याने शारीरिक अत्याचार केले. संध्याकाळी मुलीचे आई-वडिल घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार आईला सांगितला. 

तिचे आई-वडिल खंडागळे यास विचारणा करण्यास गेले असता त्याने त्यांना काठीने मारहाण करत धमकी दिली. पिडित मुलीने घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. सचिन खंडागळे याला अटक करण्यात आली असून घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Arrested for abusing a 20-year-old disabled girl