शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शेततळे घाेटाळ्यातील आराेपींना सात वर्षांनंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 5:32 PM

Crime Scam : २५ लाखांचा अपहार, विर्दभातील आठ जिल्ह्यांतील आराेपींचा सहभाग

ठळक मुद्देनरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात मित्रा संस्थेकडून शासन अनुदानावर शेततळे खाेदण्याचे काम घेण्यात आले हाेते. यासाठी संस्थेला २४ लाख ९८ हजाराचा निधी २०१३ मध्ये देण्यात आला. मात्र, संस्थेच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी केवळ कागदाेपत्रीच शेततळे दाखवून निधी हडपला. या प्रकरणी मित्रा संस्थेचे विभागीय प्रमुख ओमदेवसिंग चुडासमा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. त्यानंतर याचा काेणीच तपास केला नाही. सात तपास अधिकारी बदलूनही गुन्हा प्रलंबित हाेता. आता आराेपींना अटक झाली आहे. राजू वामनराव इंगळे (४२) रा. नागपूर, विकास प्रभाकर डांगे (३६) रा. विडूळ जि. यवतमाळ, दिनेश बापूराव वांढरे (४१) रा. नागपूर, विजय माेतीराम बरडे (३७) रा. भंडारा, अभय भीमराव तायडे रा. अडाेळी जि. वाशिम, रेवदास पंचभाई रा. चंद्रपूर, ओमप्रकाश पाथाेडे रा. आमगाव जि. गाेंदिया असे अटक झालेल्या आराेपींची नावे आहेत. नरेंद्र गणवीर रा. धामगाव जि. अमरावती, विश्वंभर तायडे रा. मलकापूर जि. बुलडाणा यांना अटक करण्यासाठी शहर पाेलिसांचे पथक गेले आहे.

आराेपींनी मित्रा संस्थेच्या माध्यमातून शेततळे खाेदण्याचे काम घेतले. त्यांना २८३ शेततळे खाेदण्याचे काम दिले गेले हाेते. यापैकी काहीच शेततळे पूर्ण केले. उर्वरित शेततळे कागदाेपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून बिले काढली. हा प्रकार पुणे येथील पथकाच्या पाहणीतून निष्पन्न झाला. त्यानंतर या प्रकरणात ९ आराेपींविराेधात कलम ४१७, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४६५, २०१, १२० ब, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. २०१३ मध्ये दाखल गुन्ह्यात पाेलिसांनी काेणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे नऊ आराेपी बिनधास्तपणे फिरत हाेते. हा गुन्हा प्रलंबित असल्यासने त्याचा तपास पूर्ण करण्याचे निर्देश पाेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. त्यावरून शहर ठाणेदार धनंजय सायरे यांनी पथकाचे गठन करून आठ जिल्ह्यात दडून असलेल्या आराेपींना शिताफीने अटक केली. यातील एका आराेपीची कारागृहात रवानगी झाली आहे. उर्वरित सहा आराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्यात आले आहे. इतर दाेन आराेपींना लवकरच अटक केली जाईल असे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सांगितले.बाॅक्स्

सात तपास अधिकारी बदलले२०१३ मध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चक्क सात अधिकारी बदलले. त्यानंतरही कारवाई झाली नाही. हा गुन्हा प्रलंबितच हाेता. अखेर आठव्या क्रमांकाच्या तपास अधिकारी ठरलेल्या ठाणेदार धनंजय सायरे यांनी आराेपींना अटक करून गुन्ह्याच्या तपासाला गती दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळPoliceपोलिस