शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ग्रामीण पोलीस निरीक्षकासह हवालदाराला २ लाखांची लाच घेताना पुण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 12:34 IST

नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.

ठळक मुद्देअटक करण्याची धमकी व तपास कामी मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक व हवालदार गुरुवारी पुण्यात

पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी स्वारगेट परिसरात सापळा रचून नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षकासह हवालदाराला अटक केली़.पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय ४८, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर(वय ४८) अशी त्यांची नावे आहेत़.  नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.दिंडोरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या गुन्ह्यात प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे़. त्यात अटक करण्याची धमकी देऊन व तपास कामी मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरसाठ व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते़. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांना वॉरंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करावी, यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती़. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़. त्याची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ नेवैद्यम हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला़. तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव आहिरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते़. त्यांनी आहिरे यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते़ त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते़. लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने रात्री पोलीस निरीक्षक राजीव शिरसाठ यांनाही अटक करण्यात आली़. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

टॅग्स :PuneपुणेCorruptionभ्रष्टाचारNashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग