शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:02 IST

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देजावई सुरेश लोंढे आणि सासरा बाळासाहेब कुरणे राहणार वडगाव तालुका हातकणंगले अशी त्यांची नावे आहेत.                             

कोल्हापूर :  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगून सुरक्षायंत्रणासह भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. जावई सुरेश लोंढे आणि सासरा बाळासाहेब कुरणे राहणार वडगाव तालुका हातकणंगले अशी त्यांची नावे आहेत.                             

दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले नवरात्र उत्सवाला काल गुरुवार पासून प्रारंभ झाला उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला या दोघांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती पणजी गोवा येथील पोलीस मुख्यालयात दिली गोवा पोलिसांनी तातडीने कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा मंदिर आवारात दाखल झाला भाविकांना कर्मचाऱ्यांना सूचना देऊन युद्धस्तरावर तपासणी मोहीम राबवली मात्र मंदिर परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने हा अफवेचा प्रकार असल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले होते.                        

मात्र, नवरात्र उत्सव काळात पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन यंत्रणेची तारांबळ उडवणाऱ्य संशयिताचा शोध घेण्याचे आदेश बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मोबाईल लोकेशन द्वारे या दोघांचा छडा लावण्यात आला पोलिसांची चार पथके सांगली जिल्ह्यात प्रमाणे झाली होती. आज सकाळी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकAnti Terrorist SquadएटीएसPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरTempleमंदिरBombsस्फोटके