फसवणुकीच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 17:45 IST2018-07-15T17:45:01+5:302018-07-15T17:45:40+5:30
येथील ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या फसवणूक प्रकरणी अटकेतील आरोपी चौकशीसाठी बाहेर काढला असता पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली.

फसवणुकीच्या गुन्ह्यातील अटक आरोपीचे पोलिसांच्या तावडीतून पलायन
शेगाव : येथील ग्रामीण पोलिसांनी शासनाच्या फसवणूक प्रकरणी अटकेतील आरोपी चौकशीसाठी बाहेर काढला असता पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली.
शेगाव खामगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आॅनलाइन परीक्षा धर्मं तीन जणांनी आॅनलाइन प्रश्नाचे संगणकावरील फोटो काढून त्याची नक्कल केली आणि शासनाची फसवणूक केल्याची घटना 13 जुलै रोजी घडली होती.या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील नेटवर्क इंजिनियर संदीप पायघन यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात अटक केलेल्या तीन आरोपींना पोहेकॉ बावणे,खराटे नापोकॉ वानखडे, यांनी तपास कामी हवालात मधून बाहेर काढले दरम्यान यातील गोपाल कृष्णा जंजाळ वय 27 रा. चिंचपुर ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.यामुळे एकच खळबळ उडाली . ग्रामीण व शहर पोलिसांनी त्या आरोपीची शोधाशोध सुरू केली. मात्र संध्याकाळपर्यत त्याचा शोध लागला नाही. . घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ प्रदीप पाटील ग्रामीण पो स्टे ला हजर झाले होते.
ग्रामीण ठाणेदार सुनिल हुड तसेच शहर ठाणेदार डी डी ढाकणे हे सुध्दा आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी जि पो अधिक्षक मिना काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.