शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"आवळा मुसक्या, कोण फोन करतो ते बघतो"; अजितदादांनी खास स्टाईलमध्ये सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:16 IST

Ajit Pawar News: पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे, असे पवार म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : ‘पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करावी, त्याबाबत राजकीय हस्तक्षेप होणार नाही. कोणीही तुम्हाला फोन करणार नाही, कोणाचा फोन आला तर सांगा, मी बघतो त्या फोनवाल्याला,’ अशा सूचना देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या पोलिसांना सूचना केल्या.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेनुसार, शहर पोलीस दलासाठी ‘हेल्थ ३६५’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील तीन हजारांवर पोलिसांना स्मार्ट वाॅचचे वाटप करण्यात आले. चिंचवड येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप झाले, तसेच यावेळी पोलिसांना सायकल व ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.  अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती करताना घाईगडबड झाली. पुरेशी साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोलीस आयुक्तालयासाठी जागा, साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल.

चोरांना पाहून पोलीस पळून जातात... पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते, इतर पोलिसांच्या मनोबलावरही परिणाम होतो. अशा पोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

गुन्हेगारावर वचक हवाn हातात केवळ काठी असतानाही तुकाराम ओंबळे या पोलिसाने दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडले, अशा शहीद ओंबळेंचा वारसा महाराष्ट्र पोलीस दलाला आहे. जागतिक पातळीवर राज्य पोलीस दलाचा लाैकिक आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी. n पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असावा. पोलिसांच्या घरांसाठी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात २५० कोटींची निविदा काढून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. लवकरच मेगा भरतीही केली जाईल, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliceपोलिसPuneपुणे