मलकापूरात दोन गटात सशस्त्र हाणामारी;१५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:41 IST2018-09-18T13:41:38+5:302018-09-18T13:41:50+5:30
मलकापूर : येथील पारपेठ प्रभागातील कुरेशी नगरात जनावरे बांधण्याच्या क्षुल्लक कारणावरून अल्पसंख्याक समाजातील दोन गटात सशक्त हाणामारीची घटना सोमवारी रात्री घडली.

मलकापूरात दोन गटात सशस्त्र हाणामारी;१५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
मलकापूर : येथील पारपेठ प्रभागातील कुरेशी नगरात जनावरे बांधण्याच्या क्षुल्लक कारणावरून अल्पसंख्याक समाजातील दोन गटात सशक्त हाणामारीची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणाविरूध्द परस्परविरोधी तक्रारीवरू गुन्हे दाखल केले आहेत.
कुरेशी नगरात जनावरे बांधण्यावरून वाद झाला. त्याच पर्यावसन सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सशस्त्र हाणामारीत झाले. मारामारीत लोखंडी पाईप, लाठ्या काठ्या, व धारदार शस्त्राचा वापर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी शे.यूनूस शे.यूसूफ वय ३६ रा पारपेठ यांच्या फिर्यादीवरून सै सरफराज सै आझाद, सै अयाज सै आझाद, इलीयाज सै लाला,सै आझाद सै सुलतान, फारूक सै रहेमान, सै अकबर सै रहेमान, सै शहजाद सै आझाद,साबीराबी सै आझाद, सै उस्मान सै रहेमान, सै सलमान सै उस्मान,सै इस्माईल सै उस्मान अशा १२ जणांविरुद्ध अ. क्र. ३३४/१८ कलम ३०७,३२४,१४३,१४७,१४८,५०६ व आर्म अँक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
तर सै ईस्माईल सै अकरम वय ३४ रा पारपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सै मुश्ताक सै सुलतान, सै अलीयाज सै सुलतान, सै अशपाक सै सुलतान अशा तिघांविरुद्ध अपराध नं ३३५/१८ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये भादवी चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे.(तालुका प्रतिनीधी)