अवैधरित्या ४१ व्हिस्कीच्या बॉटल बाळगणाऱ्या अरमान कोहलीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 01:50 PM2018-12-21T13:50:28+5:302018-12-21T13:52:18+5:30

आता उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अवैधरित्या मद्यपानाचा साठा घरी ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. जुहू येथील अरमानच्या राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे. 

Arman Kohali, who holds 41 whiskey bottles illegally, was arrested | अवैधरित्या ४१ व्हिस्कीच्या बॉटल बाळगणाऱ्या अरमान कोहलीला अटक 

अवैधरित्या ४१ व्हिस्कीच्या बॉटल बाळगणाऱ्या अरमान कोहलीला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेता अरमान कोहली हे नेहमीच वादात सापडलेला असतो. राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेतअनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे. 

मुंबई -   बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेता अरमान कोहली हे नेहमीच वादात सापडलेला असतो. कधी गर्लफ्रेंडला मारहाण तर कधी महिला सहकर्मचाऱ्याशी गैरवर्तणूकप्रकरणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आता उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अवैधरित्या मद्यपानाचा साठा घरी ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. जुहू येथील अरमानच्या राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे. 

कायद्याप्रमाणे एक व्यक्तीला १२ बॉटल्सपेक्षा अधिक मद्यपानाच्या बॉटल्स एका महिन्याहून अधिक काळ स्वतःजवळ ठेवण्यास परवानगी नाही. त्याचप्रमाणे परदेशातून एका व्यक्तीस एका बॉटलहून अधिक बॉटल्स आणण्याची मुभा नाही. अरमान कोहलीची याप्रकरणी वांद्रे उत्पादन शुल्कच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे. नुकतेच अरमान कोहलीविरोधात मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

पुन्हा अभिनेता अरमान कोहलीविरोधात गुन्हा; महिला सहकलाकाराशी केली गैरवर्तणूक 

Web Title: Arman Kohali, who holds 41 whiskey bottles illegally, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.