शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 08:52 IST

एकीकडे देशभरात सोनम रघुवंशी प्रकरण चर्चेत असतानाच, आता महाराष्ट्रात राजा रघुवंशी हत्याकांडासारखी घटना घडली आहे.

एकीकडे देशभरात सोनम रघुवंशी प्रकरण चर्चेत असतानाच, आता राजा रघुवंशी हत्याकांडासारखी घटना घडली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या नागपूरमधून समोर आली आहे. नागपूरमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आजारी पतीची हत्या केली. सुरुवातीला महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय दिशा रामटेकने तिचा प्रियकर आसिफ उर्फ राजाबाबू टायरवाला याच्या मदतीने तिच्या अंथरुणाला खिळलेल्या पती चंद्रसेन रामटेकची हत्या केली. ही घटना तारोडी खुर्द परिसरात घडली आहे. चंद्रसेन यांना लकवा मारल्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच काळात दिशा आणि आसिफ यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.

भांडणातून रचला हत्येचा कट

दिशाचे पती चंद्रसेन यांना जेव्हा दिशा आणि आसिफच्या संबंधांबद्दल समजले, तेव्हा त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाले. या भांडणातूनच चंद्रसेनला संपवण्याचा कट रचण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी दिशाने चंद्रसेनला अंथरुणावर झोपवले आणि आसिफने उशीने त्यांचे तोंड दाबून त्यांचा गळा आवळला. सुरुवातीला महिलेने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा केला, पण शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे समोर आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दिशाने आपला गुन्हा कबूल केला.

राजा रघुवंशी हत्याकांडमध्य प्रदेशातील इंदूरमध्येही अशीच एक घटना घडली होती, राजा रघुवंशी यांची त्यांची पत्नी सोनमने हनीमूनवर असताना त्यांची हत्या केली. सोनमचे राज कुशवाहसोबत, प्रेमसंबंध होते आणि याच कारणामुळे तिने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. राजाचा मृतदेह २ जून रोजी मेघालयमधील एका दरीत सापडला होता, तर पत्नी सोनम बेपत्ता होती. तिला नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारnagpurनागपूर