शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दीपक मानकरवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:48 IST

दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल केला आहे.

पुणे : जितेंद्र जगताप यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल केला आहे. 

    सामाजिक कार्यकर्त्या आदिती माधव दीक्षित यांना वारसाहक्काने मिळालेल्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करुन ती तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली़. विक्री करताना पुरेसा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दीपक मानकर, साधना वर्तक आणि मुकंद दीक्षित यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हडपसर पोलिसांनी दीपक मानकर यांच्यासह अमित बेहडे, गुरुनामसिंग बतियानी व इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी अजय अग्रवाल यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील भेकराईनगर ग्लायडिंग सेंटरजवळ बेहडे टॉवर आहे. येथील जमीन विकसित करण्याचा अमित बेहडे आणि अजय अग्रवाल यांच्या विकसन करार २००३ मध्ये झाला होता. काही काळाने त्यांच्यात व्यावसायिक वाद उत्पन्न झाला व प्रकरणी न्यायालयात गेले. दरम्यान, २०१५ मध्ये बेहडे यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी दीपक मानकर यांना सुपारी दिली़. मानकर यांनी अजय अग्रवाल यांच्याकडे २५ लाख रुपयांची सुपारी मागितली होती. अग्रवाल यांनी आजवर घाबरुन याची माहिती कोणाला दिली नव्हती. दीपक मानकर यांच्याविरुद्ध कोथरुडला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे खंडणी मागितल्याची फिर्याद दिली़. त्यानुसार हडपसर पोलिसांनी दीपक मानकर, अमित बेहडे, गुरुनाम सिंग बतियानी व इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेExtortionखंडणीPoliceपोलिस