शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

श्रीमंत तरुणींना जाळ्यात ओढणार्‍या बुबणे याच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 9:07 PM

आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आईचे आजारपण तसेच हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून ९३ हजार रुपये उकळले.

पुणे : श्रीमंत कुटुंबातील महिलांना जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधींची फसवणुक करणाऱ्या अनिकेत बुबणे याच्याविरुद्ध आणखी एका तरुणींने पुढे येऊन फिर्याद दिली आहे. बुबणे याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळी कारणे सांगून तिची ९३ हजार रुपयांची फसवणुक केली आहे.बिबवेवाडी येथील एका व्यावसायिकाच्या घरातील महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३०, रा़ श्रीकृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) याने या महिलेला तिच्याच घरात चोरी करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्या सांगण्यावरुन महिलेने त्याला घरातील १ कोटी रुपये व दागिने चोरण्यास मदत केली होती. सुमारे पावणे दोन कोटीचा ऐवज घेऊन बुबणे पसार झाला होता. त्याने फसविलेल्या एक तरुणीच्या मदतीने गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याला अटक केली होती. त्याने कोंढवा येथील एका २८ वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले होते. ही तरुणी खासगी कंपनीत कामाला आहे. सोशल मिडियावरील एका साईटवर त्यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आईचे आजारपण तसेच हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून ९३ हजार रुपये उकळले होते.बुबणे याला पकडल्याचे या तरुणीला समजल्यानंतर तिने गुन्हे शाखेकडे येऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीWomenमहिलाPoliceपोलिस