शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:14 IST

चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारचालकाने १२ जणांना उडविल्याची घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. यात जखमी असलेले काहीजण एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिघांचे फ्रॅक्चर झाल्याने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींना शेजारील रुग्णालयातच दाखल केले आहे.

चालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी) तसेच त्याचा साथीदार राहुल गोसावी यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी सायंकाळी एकत्रित आले होते. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने बारा जणांना धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार या बारा जणांपैकी तिघांना संचेती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अन्य नऊ जण किरकोळ जखमी असून त्यांना योगेश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कारचालक मद्यधुंद? तपासणीस नेले ससूनमध्ये

चालकास वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी ससून रुग्णालयात नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

जखमींची नावे : अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद.

जखमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांची एक परीक्षा उद्या होणार आहे. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.-हेमंत रासने, आमदार कसबा विधानसभा

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याcarकारAccidentअपघातPuneपुणे