शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मुलीवर सामूहिक बलात्कार करून डोळे काढले, त्यानंतर मृतदेह नग्नावस्थेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 21:04 IST

Gangrape Case : बिहारमधील बांका जिल्ह्यातील चंदन पोलीस ठाण्याच्या परिसरात ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

बांका - होळीच्या दिवशी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह शनिवारी रात्री अकरा वाजता सापडल्याने खळबळ उडाली आहे. बिहारमधील बांका जिल्ह्यातील चंदन पोलीस ठाण्याच्या परिसरात ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी कुटुंबीयांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. एका आरोपीच्या मुलाला जमुई येथून ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या घटनेचा रस्तावर निषेध करत शेकडो महिला व मुलींनी रविवारी चंदन देवघर मुख्य रस्ता सुमारे दोन तास रोखून धरला होता.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी पाच वर्षांच्या भावासह घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गा मंदिराजवळ होळी खेळण्यासाठी गेली होती. एका व्यक्तीने तरुणी आणि तिच्या भावाला गाडीत बसवले. काही अंतर गेल्यावर त्याने भावाला टाकून मुलीचे अपहरण केले. मुलगी बेपत्ता असल्याच्या संशयावरून कुटुंबीयांनी तिचा शोध घेऊन चंदन पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली.

मुलीच्या पोटात दुखू लागल्याने समोर आले भयानक सत्य, होळीच्या दिवशी केला होता बलात्कार

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय चंदन रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ पोहोचले असता दोन-चार कुत्रे घिरट्या घालताना दिसले. कुटुंबीयांनी जाऊन बघितले असता पाय वाळूने झाकलेले दिसले. वाळू बाजूला केल्यानंतर मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत दिसला. मुलीच्या अंगावर जखमा होत्या. तसेच डोळे काढले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन बांका येथे पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी चंदनबाजारचे रहिवासी अजय वरनवाल, टोटो चालक डोमन पासवान आणि श्रीधर वरनवाल ऊर्फ ​​छोटू वरनवाल या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच टोटो मालक सागर सोनी याच्या मुलाला पोलिसांनी जमुई येथून अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू