शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Anil Deshmukh Arrested: लकी ते अनलकी! जिल्हा परिषद सदस्य ते गृहमंत्री अन् आता ईडीच्या अटकेत, अनिल देशमुख यांचा प्रवास

By यदू जोशी | Updated: November 2, 2021 07:00 IST

Anil Deshmukh arrested by ED: कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल, ही त्यांचीच भविष्यवाणी होती.

- यदु जोशीमुंबई - अनिल वसंतराव देशमुख (Anil Deshmukh). त्यांचं वर्णन विदर्भात अन् राज्यातही एक लकी नेता असंच होत राहीलं. पण आज ते अनलकी ठरले. ईडीने अटक केल्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द झाकोळली गेली आहे. (Anil Deshmukh arrested by ED)

कोणतंही सरकार आलं तरी अनिलबाबूंच्या डोक्यावरचा लाल दिवा जात नाही असं लोक म्हणायचे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख हे अनिलबाबूंचे सख्खे चुलत भाऊ. नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे त्यांचं मूळ गाव. गावात, काटोलमध्ये आणि नागपुरातही दोघांची घर आजूबाजूला. रणजितबाबूंच्या सावलीतच अनिलबाबू १९९२ मध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य झाले अन् नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षही. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तत्कालिन आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली अन् अनिलबाबूंनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष लढले. तेव्हा त्यांची निशाणी होती, गॉगल. त्यावेळी लोकप्रिय असलेल्या एका गाण्याची काटोलच्या प्रचारात धूम होती. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा.. अनिलबाबू जिंकले देखील. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला ३५ अपक्ष आमदारांचा टेकू मिळाला अन् अनिलबाबू शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री झाले. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीतर्फे जिंकले आणि मंत्री झाले. तेव्हापासून एक वर्षाचा अपवाद वगळता ते कॅबिनेट मंत्री राहिले. उत्पादन शुल्क, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक उपक्रम अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे वेगवेगळ्या कार्यकाळात होती. (Anil Deshmukh's political career.)

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले. ज्या रणजित देशमुखांचे बोट धरून अनिलबाबू राजकारणात आले त्यांचे पुत्र आशिष देशमुख यांना भाजपने काटोलमधून उमेदवारी दिली. काका-पुतण्याच्या लढतीत पुतण्याने काकाला मात दिली. मग पाच वर्षे अनिलबाबू मंत्रालयात फिरकले नाहीत. त्यांनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. आशिषने भाजपचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत काटोलची जागा राष्ट्रवादीला गेली आणि अनिल देशमुख रिंगणात उतरले. आशिष, रणजितबाबू, काटोल शहरातील अनिलबाबूंचे प्रतिस्पर्धी राहुल देशमुख असे सगळे दिमतीला होते. अनिलबाबूंप्रति मतदारांमध्ये एक सहानुभूती होती अन् ते आरामात जिंकले. उमेदवारी मिळायच्या आधी काही दिवस त्यांच्या कार्यक्रमांतून घड्याळाचे बॅनर गायब झाले त्याच्या बातम्याही झाल्या. अनिलबाबू राष्ट्रवादी सोडणार अशीही चर्चा रंगली पण त्यांनी शरद पवार यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेत घड्याळ सुरू ठेवले. त्यांचे पुत्र सलिल यांची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती पण वडिलांच्या इच्छेखातर ते थांबले. आता ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. 

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात एका वृत्त वाहिनीच्या मुंबईहून आलेल्या प्रतिनिधीने अनिलबाबूंची मतदारसंघात मुलाखत घेतली. तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही बघा! राज्यात राष्ट्रवादी-शिवसेना-्काँग्रेसचं सरकार येईल. पुढे चमत्कार झाला अन् महाविकास आघाडीचं सरकार आलं. अनिलबाबूंनी वर्तविलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आल्यानंतर चर्चा सुरू झाली की गृहमंत्री कोण होणार? अजित पवार, जयंत पाटील की दिलीप वळसे? पण या गर्दीत अनिलबाबू डार्कहॉर्स ठरले, थेट गृहमंत्री झाले. वयाच्या सत्तरीत त्यांना अत्यंत महत्त्वाचं खातं मिळालं. लाल दिव्याशिवाय अनिलबाबू राहत नाहीत याचा पुन्हा प्रत्यय आला.

गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले पण अनिल देशमुख एखाद्या योद्धयासारखे राज्यभर फिरले. पोलिसांचं मनोबल वाढविण्याचं काम त्यांनी केलं. अनेक धाडसी निर्णयही घेतले. मात्र, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके सापडले, मनसुख हिरेनची हत्या झाली अन् अनिलबाबूंचे ग्रह बदलले. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटविल्यानंतर त्यांनी एक लेटरबॉम्ब टाकला. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या त्या पत्रात परमबीर यांनी १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप देशमुख यांच्यावर केले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले अन् ५ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. सीबीआय, ईडीच्या फेऱ्यात अनिल देशमुख अडकले आणि अखेर त्यांना आज अटक झाली. विदर्भातील एका उमद्या नेत्यांची चांगली कारकिर्द अटकेने मात्र काळवंडली आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर