शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटी वसुली प्रकरणः ईडीने केली बारमालकाची चौकशी तर इतर ५ जणांना बजावले समन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 20:44 IST

Anil Deshmukh case : या तपासासाठी ईडीच्या मुंबई शाखेने काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली असून त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देईडी सूत्रांनी असेही म्हटले आहे की, याचिकाकर्त्या वकील जयश्री पाटील आणि बार मालकांशी संबंधित पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या सचिन वाझे यांना संबंधित प्रश्न विचारले जातील.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १०० कोटी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. या तपासासाठी ईडीच्या मुंबई शाखेने काही बड्या रेस्टॉरंट मालकांना चौकशीसाठी नोटीस पाठविली असून त्यांना त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. यासाठी ईडीने प्रश्नांची यादी तयार केली आहे.ईडी सूत्रांनी असेही म्हटले आहे की, याचिकाकर्त्या वकील जयश्री पाटील आणि बार मालकांशी संबंधित पोलीस सेवेतून निलंबित केलेल्या सचिन वाझे यांना संबंधित प्रश्न विचारले जातील. कारण असा आरोप आहे की,  अंधेरी वेस्टसह अनेक भागात सचिन वाझेला रेस्टॉरंट्स आणि बारच्या मालकांकडून पैसे दिले जात होते. ईडी टीमने या प्रकरणी चौकशीसाठी ५ बारमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. जे सचिन वाझेला हफ्ता पैसे देत असे.

ईडीने आज सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. त्यापैकी शिवाजीनगर भागातील भटेवार हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी असल्याची माहिती आहे. ईडीच्या दुसऱ्या पथकाने सदर येथील न्यू कॉलनी येथील एका इमारतीवर धाड टाकली. आयझेक कुटुंबीयांचा हा बंगला असून समित आयझेक हेसुद्धा अनिल देशमुख यांचे जवळचे समजले जातात. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी येथील आयझॅक कुटुंबीयांच्या बंगल्यात दाखल झाले. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. याशिवाय नागपुरातील जाफरनगर भागातील एका ठिकाणी ईडीच्या अधिकाºयांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसsachin Vazeसचिन वाझेadvocateवकिलHome Ministryगृह मंत्रालय