बापरे! संतापलेल्या जावयाने सासूला एवढं मारलं की तिचं नाक तुटलं अन्...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:16 IST2023-07-27T15:12:57+5:302023-07-27T15:16:00+5:30
किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत.

बापरे! संतापलेल्या जावयाने सासूला एवढं मारलं की तिचं नाक तुटलं अन्...; नेमकं काय घडलं?
बिहारच्या बेगुसरायमध्ये जावयाने आपल्या साथीदारांसह आपच सासू, मेव्हणी आणि मेव्हण्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसराच एकच खळबळ उडाली आहे. लोहिया नगर सहायक पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड क्रमांक 11 मधील ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत.
जखमी किरण देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई आणि काही लोक अचानक घरात घुसले आणि शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली. मुलीवर सतत अत्याचार होत होते, याला तिच्या मुलीने विरोध केला, म्हणून त्या लोकांनी ही घटना घडवली. लग्न झाल्यापासून जावई व सासरच्या मंडळीकडून मुलीचा सतत छळ होत असल्याचं जखमींनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जावयाने केलेल्या मारहाणीमुळे सासूचं नाक तुटलं आहे. जावई काही ना काही मागणी करत राहतो, जे देण्यास असमर्थ असल्याचे जखमींनी सांगितले. यानंतर ही भयंकर घटना घडली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या लहान मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. ही घटना जावयानेच घडवून आणल्याचा आरोप होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.