संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 07:22 PM2018-09-20T19:22:10+5:302018-09-20T19:22:34+5:30

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय वडिलांना कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 

Angry ... ... Naradham baba police arrested rape of a stomach girl | संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक 

संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक 

Next

ठाणे - एका नराधम बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या चार वर्षापासून मुलीवर नराधम बापाचा अत्याचार सुरू होता. पीडित मुलीने शेजारी राहणाऱ्या लोकांना हा प्रकार सांगितल्यावर हि खळबळजनक घटना समोर आली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय वडिलांना कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. 

पीडित मुलीची आई आणि वडिलांचा घटस्फोट झाला आहे. मुलगी वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांसोबत राहत होती. तिचे वडील तिला घराच्या बाहेर जाण्याची देखील मुभा देत नसत. वायरमनचे काम करणारे वडील नेहमी शारीरिक त्रास देत असल्याचे पीडितेने सांगितले आहे. हा सर्व घडला प्रकार पोलिसांनी मुलीच्या आईला कळवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक करून त्याच्यावर पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Angry ... ... Naradham baba police arrested rape of a stomach girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.