२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:45 IST2025-08-12T14:45:01+5:302025-08-12T14:45:51+5:30

सोमवारी जेव्हा पीडित त्याच्या दवाखान्यासमोरून जात होता. तेव्हा डॉक्टरने त्यांना बोलावले. तो दवाखान्यात गेला असताना त्याच्याकडे शिल्लक रक्कमेबाबत विचारणा केली.

Angry doctor attacks patient in Bokaro, Bihar over non-payment | २०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी

२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी

बोकारो - बिहारच्या बोकारो जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका रुग्णाने उपचारानंतर फी न दिल्याने डॉक्टर चांगलाच संतापला. त्याने कैचीने रुग्णावर जीवघेणा हल्ला केला. 

माहितीनुसार, सतनपूर येथील रुग्ण गोविंद बाउरी यांच्यावर डॉक्टर पी कुमार यांनी फी न दिल्याने कैचीने हल्ला केला आहे. जखमी अवस्थेत रुग्ण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पोहचला. तिथे पोलिसांनी उपचारासाठी त्याला हॉस्पिटलला पाठवले. पीडित व्यक्ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. काही दिवसांपूर्वी तो आजारी होता. त्यावेळी डॉक्टरांकडे तो उपचारासाठी गेला. डॉक्टरांना काही पैसे दिल्यानंतर २०० रूपये उधारी ठेवली होती. २ आठवड्यात पैसे देतो असं त्याने डॉक्टरांना सांगितले. आरोपी डॉक्टर सतनपूर गावातच एका खोलीत दवाखाना चालवतात. 

सोमवारी जेव्हा पीडित त्याच्या दवाखान्यासमोरून जात होता. तेव्हा डॉक्टरने त्यांना बोलावले. तो दवाखान्यात गेला असताना त्याच्याकडे शिल्लक रक्कमेबाबत विचारणा केली. त्यावर त्याने आणखी २ आठवड्याची मुदत मागितली. त्यावेळी संतापलेल्या डॉक्टरने त्याच्याजवळील कैचीने पीडित व्यक्तीवर हल्ला केला. डॉक्टरने त्याच्या पाठीवर चार वार केले, चेहऱ्यावर कैचीने मारले त्यात थोडक्यात रुग्णाचा डोळा वाचला. रुग्णाच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि पाठीवर खोल जखमा झाल्या असून कसाबसा जीव वाचवून तो तिथून पळाला आणि थेट पोलिसांकडे पोहचला. 

दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून आरोपी डॉक्टरला लवकरात लवकर पकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करू असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Angry doctor attacks patient in Bokaro, Bihar over non-payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.