OYO रूम बुक करायचे अन् गांजा विकायचे… पोलिसांनी प्रेमी युगुलाला केली अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:57 IST2025-01-26T12:57:35+5:302025-01-26T12:57:52+5:30
अटक केलेल्या प्रेमी युगुलामध्ये मुलगा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे, तर मुलगी मध्य प्रदेशची आहे.

OYO रूम बुक करायचे अन् गांजा विकायचे… पोलिसांनी प्रेमी युगुलाला केली अटक!
आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी एका प्रेमी युगुलाला ओयो (OYO) हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे दोघं ओयोवरून रुम बुक करायचे आणि रुममध्ये अवैध काम करत होते. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. अटक केलेल्या प्रेमी युगुलामध्ये मुलगा आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे, तर मुलगी मध्य प्रदेशची आहे.
हे प्रेमी युगुल ओयोवरून एक खोली बुक करत होते. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या या रुममध्ये गांजा विकायचे काम करत होते. अनेक दिवसांपासून गांजा विकण्याचा व्यवसाय हे दोघेही करत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, आरामदायी जीवन जगण्यासाठी हे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा आणायचे, ओयोमधून रुम बुक करायचे आणि तिथेच राहायचे आणि तिथूनच ते विक्री करत होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कवला येथील देवेंद्र राजू आणि मध्य प्रदेशातील संजना मांजा यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघेही एकत्र राहत होते. त्यांना भरपूर पैसे कमवायचे होते आणि आरामदायी जीवन जगायचे होते. यासाठी त्यांनी गांजा विक्री करण्याची योजना आखली. तसेच, ओयो रूम भाड्याने घेऊन गांजा विकायला सुरुवात केली. आता पोलिसांनी दोघांनाही हैदराबादच्या कोंडापूर येथील ओयो रूममधून अटक केली आहे.
शुक्रवारी रात्री एसटीएफ पथकाने तपास करून छापे टाकले. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा आणायचे आणि ओयो रूममधून विकत होते. आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी ओयो रूममध्ये राहत होते. यासंबंधीची माहिती मिळताच, पोलिसांना प्रकरण उलगडण्यात यश आले. सध्या या दोघांची पोलीस चौकशी करत आहे.