कारवर अज्ञातांचा हल्ला, देलवडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:01 IST2018-09-26T02:01:33+5:302018-09-26T02:01:44+5:30
देलवडी (ता. दौंड) येथे २ महिन्यांंपूर्वी वाळूच्या वादातून खून झालेल्या स्वप्निल शेलार याचा भाऊ फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या स्विफ्ट गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. दरम्यान या वेळी जिवंत काडतुसेही सापडली.

कारवर अज्ञातांचा हल्ला, देलवडी येथील घटना
दौंड : देलवडी (ता. दौंड) येथे २ महिन्यांंपूर्वी वाळूच्या वादातून खून झालेल्या स्वप्निल शेलार याचा भाऊ फिर्यादी विशाल ज्ञानदेव शेलार यांच्या स्विफ्ट गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. दरम्यान या वेळी जिवंत काडतुसेही सापडली.
ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजता घडली. विशाल शेलार घरात झोपलेले होते. त्यांच्या घराबाहेर स्विफ्ट गाडी लावलेली होती. अज्ञात आरोपींनी स्वीफ्ट व्हीडीआय (एमएच ४२-एएच ४७१८) या गाडीवर धारदार सशस्त्र हल्ला केला. यामुळे गाडीचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी शेलार घरामध्ये झोपले होते. जोराचा आवाज आल्याने ते घराबाहेर आले. दरम्यान शेलार यांच्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. घटनास्थळी काडतुसेही सापडली आहेत.
फिर्यादीचे मोठे भाऊ स्वप्निल ऊर्फ पिंटु ज्ञानदेव शेलार यांचा गेल्या महिन्यात खुन करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री काही लोक संशयास्पद घराशेजारी फिरत असल्याचे शेलार कुटुंबियांनी सांगितले. यवत पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
या संदर्भात बापूराव शेलार यांनी यवत पोलिसांना फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.